बंध रेशमाचे
बंध रेशमाचे
1 min
14.4K
हे बंध रेशमाचे केव्हाच तोडले मी ।
खोट्या महानतेला केव्हाच सोडले मी ।।
बाजार यातनांचा मांडू उगी कशाला ?
दुसऱ्यास दुःख देणे केव्हाच सोडले मी ।।
मी मुक्त आज झाले जगण्या मनाप्रमाणे,
आधार भावनांचा घेणेच सोडले मी ।।
का वाहिल्या पखाली संसार सावराया ?
चिंता करीत जगणे केव्हाच सोडले मी ।।