भय काळाचे नका धरू
भय काळाचे नका धरू
लाल रंगी ह्या आठ बाटल्या
जलात अर्ध्या कुणी बुडविल्या
काळी दिसते एक बाटली
दूर तियेवर नजरा खिळल्या. (१).
लाल भडक.अभिसारे नटल्या
जली बुडाल्या जणू की युवती
दूर उभी का कृष्णसुंदरी ?
नशा धुंद त्या जली विहरती (२).
महसुलाचे हुकमी साधन.
मद्य विक्री ती खुळी असे.
अनेक वस्तू गरजेनुसार पण
बेवड्यासी का जाणं नसे? (३).
असतील ही बुद्धिबळ ची प्यादी
चाल न त्यांची असते साधी.
राजकारणी खेळ गड्यांच्या.
बदलाची का ही असेल नांदी ?(४).
लाल रंग रक्ताचा आपुल्या.
गरज रक्त पुरवठ्याची.
काळी बाटली काळ उभा.
झदप घालण्या रुग्णावर ती (५)
किटले आता कान आमुचे.&nbs
p;
ऐकुनी आश्वासन,आव्हाने.
तेलही गेले तूपही गेले.
उरले हाती धुपाटणे. (६).
मरु लागले करो ना बाधित.
रोज शेकडो चिता भडकती.
या बंदिने काय साधले. ?
घरी बैसूनी खुंटली मती. (७).
नको मद्य ते हव्यात चपला,.
हवेत चश्मे,छत्र्या,कपडे.
विद्यार्थ्यांची कीव येतसे.
भवितव्य ने झोप उडे. (८).
अर्थ बोध घ्या तुम्ही सुजन हो.
भय काळाचे नका धरू.
हद्दपार तो करा करोना.
होऊ देत व्यवहार सुरू (९).