STORYMIRROR

Umakant Kale

Others

2  

Umakant Kale

Others

भूक

भूक

1 min
2.9K


पोटात उठते वादळ,भूक तिचे होय नाव

खळगी भरण्यासाठी धावतात मग पाय

 

काय काय नाही करावं लागतं

कधी कधी मन मारुन जगावं लागतं

दु:खाच्या सागरात रोज पोहावं लागतं

डोळ्यात पाणी असून हसावं लागतं

पोटात उठते वादळ,भूक तिचे होय नाव

खळगी भरण्यासाठी धावतात मग पाय..

 

भूक हा महाभयंकर रोग

झोपडपट्टी नांदतो रोज

निझते मग तेथे उपाशी पोट

ही आहे कटकट आता रोज

पोटात उठते वादळ,भूक तिचे होय नाव

खळगी भरण्यासाठी धावतात मग पाय

 

भूक दिली ग रे देवा

न भरवला तु घास

पाणावलेल्या लोचनांना

आतातरी दाखव तु आस

पोटात उठते वादळ,भूक तिचे होय नाव

खळगी भरण्यासाठी धावतात मग पाय

 

गरीबी हा झाला ताप

गरीबाना मिळाला तो श्राप

तो निवारण्याठी करतो जाप

नाही सापडत भूकेचे हो माप

पोटात उठते वादळ,भूक तिचे होय नाव

खळगी भरण्यासाठी धावतात मग पाय..


Rate this content
Log in