भक्तीचा महापूर
भक्तीचा महापूर
1 min
208
वारकरी भक्तीभावे
विठ्ठलाच्या वारीमधे
पांडुरंग भेटीचिये
आस लागे मनामधे
वर्षे कितीक लोटली
भक्तीमार्ग हा वारीचा
मनी श्रद्धाभाव दाटे
नाम विठ्ठलाचे घेता
हरीनाम भजनात
धुंद टाळ्या गजरात
वारी चाले अभंगात
दाटे आनंद मनात
मेळा नाचे वैष्णवांचा
आषाढीला वाळवंटी
महापूर हा भक्तीचा
देव मनी सुखावती
