भजी
भजी




कालवावे डाळीचे पीठ
मीठ मिरची घालून
त्यात टाकावा
ओवा थोडा चोळून
हवा असल्यास कांदा
घालावा बारीक चिरून
सैलसर भिजवावे
पाणी घालून
वरून कोथिंबीर
घालावी अर्धीवाटी
कढईत तेल तापवून
सोडावी भजी दाटीवाटीत
सुंदर लालसर रंग
येई छान त्यास
पसरे खमंग
सगळीकडे वास
तळतानाच गरमागरम
जातात चार दोन तोंडात
उल्हास मात्र बाकी असतो
किती छान झाली सांगण्यात