STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

भित्र्या सशाला...

भित्र्या सशाला...

1 min
19K



अक्षरगण वृत्त : भुजंगप्रयात

१.कडव्यात चार चरण

२.चरणात १२ अक्षरे

३.गण : य य य य

४.यातिस्थान ६वे व १२वे अक्षर.

( लग क्रम : ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा)


नशा ती जिवाला छळाया निघाली

तिचे हात जेव्हा गळा हार झाले

हुसासा सुटावा तिच्या सांगण्याने

सगे सोयरेही तडीपार केले...१


जिथे पाखरांना नकोसा विसावा

मनातून खोपे जपे झाड वेडे

मुका तो उभा शब्द घामेजलेला

नकारा नको रे जरा थांब थोडे...२


गुलाबा तुझा काय दावा कळेना

मिठीला अवेळी नखे टोचताना

निखारे कुठे ते जरा वांझ झाले

विखारी दवाचे धुके सोसताना...३


तसाही कशाचा उगा सोस नाही

तरीही उखाडा असा तो उशाला

मनाला असा फास काचेल जेव्हा

उडी मार सांगेन भित्र्या सशाला...४


Rate this content
Log in