STORYMIRROR

Pandit Warade

Others

2.5  

Pandit Warade

Others

बहिणीची माया

बहिणीची माया

1 min
30.7K


जगी थोर नाते

असे बहीण भावाचे

अतिशय पवित्रतेचे

जिला तोड नाही अशी

असते बहिणीची माया


आई असते मायेचा सागर

तर बहीण असते त्याच

सागरातून भरलेली घागर

मायेची सावली!

भावाशी प्रेमाने भांडते,

तेवढ्याच आतुरतेने वाटही पाहते

ती बहिणीच असते


सण रक्षाबंधनाचा

किंवा असो भाऊबीजेचा

जीव जिचा तळमळतो

झुरतो भावाच्या भेटीसाठी

त्याच्यावरच्या मायेच्या पोटी


भावाला ओवाळतांना

मागत असते देवाजवळ

त्याच्यासाठी दीर्घायुष्य

घालत असते साकडं देवाला

बहिणीचीच वेडी माया


हातावर राखी बांधतांना

देवाजवळ रक्षण मागते

त्याच्या वृत्तीचं, विचारांचं

दृष्टीच रक्षण कर असं सांगणारी

भावाची बहिणच असते

बहिणीची माया असते


Rate this content
Log in