STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Others

3  

Yogini "कृष्णाई"

Others

बहिणी

बहिणी

1 min
27

बहिणी तशा सहा,

पण सगळे एकत्र जमले,

की म्हणायचे,

नुसता यांचाच नखरा पाहा...


सगळ्यात मोठी जरा शांत,

अन् सगळ्यात धाकटी होती अशांत,

दुसरी आणि पाचवी जरा होत्या अगाऊ,

मधल्या दोघींचं तर कौतुक काय सांगू....


धाकटी होती सगळ्यात लाडाची,

बाकी बहिणींच्या मनात राहायची...


मोठी होती शांत म्हणून सगळ्यांना आवडायची,

दुसरी होती खट्याळ पण सगळ काम करायची...


तिसरीचा नाद होता मोठ्या माणसात रमायचा,

चौथीला नाद होता सगळ काही आवरायचा...


पाचवी होती लाडुक, धाकटीला सावरायची,

काहीच काम न करता दोघी नुसता गप्पा ठोकायची...


सगळ्यांना होती एकमेकींची ओढ,

एकत्र आल्या की घरात

बनायचं गोड,

खाऊन मस्त सगळ्या खेळ खेळत असत,

कोणीही न आडवणार त्यांना, 

ते गप्पात रमत असतं...


मोठ्या झाल्या बहिणी आता,

एक कुठे तर दुसरी कुठे,

पक्ष्यासरखं उडून गेल्या साऱ्या,

आता फक्त आठवणी मनात उरे...


Rate this content
Log in