बहिण ती माझी (सहाक्षरी)
बहिण ती माझी (सहाक्षरी)
1 min
202
करी दादा दादा
घरभर शोधी
अस्वस्थ होतसे
बहिण ती माझी.....
खोडया करी माझ्या
येवून चिडवी
नाव सांगे आई
बहिण ती माझी.....
बाजू माझी घेई
आई बाबा परी
करी असे प्रेम
बहिण ती माझी....
विचारते सदा
गेलीया सासरी
भेटी मग येते
बहिण ती माझी....
आईस मदत
करते आजही
आईची हो आई
बहिण ती माझी......
