STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

भेट 'मी' च्या 'मन' या बॉसची !

भेट 'मी' च्या 'मन' या बॉसची !

1 min
668


भेट 'मी' च्या 'मन' या बॉसची !


भेट घेण्यासाठी वेळ मागीतली मी

माझ्याच 'मन' ह्या बॉसची

तर केवढे हे आढे-वेढे घेत होत

पाहून न पाहिल्यासारखे करत होत!


त्याचे काम असते तेंव्हा

खुशाल हे कर, ते कर

म्हणून फार्मन सोडत असायच

आपल्याच मना सारखे सतत काम करून घेत होत!


मी ही हट्टी

भेट घेण्याची वेळ न ठरवता

अचानक त्याला भेटायला गेले

तर म्हणतोस कसा ? मी बिझी आहे नंतर ये!


अस कस हे माझ 'मन' माझ्यातच राहून

सतत बिझी कस असत?

कोणाला बाहेर भेटायला जात

शोधायला पाहिजेच एकदा!







Rate this content
Log in