STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

भावपूर्ण श्रद्धांजली...!

भावपूर्ण श्रद्धांजली...!

2 mins
4.8K


आज(२४/१/२०१९)माझे गुरू श्री. सरदेसाई सरांचे निधन झाल्याचे समजले आणि पायाखालची जमीन सरकली.काही काही नाती अतूट असतात ती कोणत्याही परिस्तिथीत आणि कोणत्याही प्रसंगात कलुषित होत नाहीत कारण ती अंतर्मनाच्या प्रेम धाग्यानी घट्ट बांधलेली असतात.सर गेल्याचे समजले आणि आशीर्वादाचा शिरावरचा हात जाणवला.खूप खूप प्रेम सरांनी दिलं.त्यांच्या मुळेचआम्ही चार घास खातोय याची जाणीव सदैव उरात राहील.त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येणे शक्य नाही किंबहुना त्या ऋणात राहणेच भाग्याचे म्हणावे वाटते. आम्ही खरोखरच नशीबवान आम्हाला सरांसारखे वडीलधारी गुरू लाभले आणि आमच्या जन्माचे सोने झाले.ज्यांना ज्यांना यांचा परिसस्पर्श झाला त्यांचा जन्म सार्थकी लागला आणि जीवन कृथार्थ झाले.सरांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि या दुःखद धक्क्यातून सावण्यासाठी बळ मिळो.त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या शिरावर राहील यात शंका नाही.आठवण म्हणून त्यांना पाठवलेली कविता शेअर करावी वाटते म्हणून पोष्ट करीत आले.इतक्या बारीक सारीक आठवणी आहेत त्या झटकन डोळ्यासमोर येत आहेत पण सर्वच्या सर्व अंतर्मनाच्या कोंदणात साठत आहेत आणि मन दुःखावेगाने जडावते आहे.


आठवता गुरुस माझ्या

सारे गुरू नजरे समोर आले

ज्यांनी ज्यांनी मोलाचे

संस्कार मजवर आजवरी केले


तळ हातावरचा फोड जपावा

तसे साऱ्या गुरूंनी मज सांभाळले

त्या प्रेमाच्या ऋणात मी जन्मभर

राहतो सुखाने हे सत्य जीवनाचे खरे


नतमस्तक होउनी नमन करावे

सदैव गुरू चरणाशी भजावे

हेच सौख्य शांतीचे खरे साधन

सदैव मिळवून देते जीवनी समाधान


आशीर्वाद गुरूंचा सर्वांना सदैव लाभू दे

सुख समृद्धी सदैव घरी गुरू कृपेने नांदू दे

गुरू चरणाशी शीर नतमस्तक होऊ दे

गुरू दर्शनाने कृथार्थ जीवन होऊ दे...!!


सर्व गुरूंना शिक्षक

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



Rate this content
Log in