STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

3  

Nalanda Wankhede

Others

भावना

भावना

1 min
295


भावना करतात विद्रोह

भावना प्रेरणादायी ठरतात

भावनांचा होतो झंझावात

भावना बंडखोर असतात


भावना असतात कधी भयाण

भावनांना फुटतो कधी अंकूर

भावना होतात कधी रौद्र

भावना ढाळतात कधी अश्रु


भावना असतात कधी आशावादी

भावना घालतात तालमेल

भावनांचा होतो कधी बोध

भावनांची होते कधी घालमेल


भावना प्रसवतात वेदना

भावनांची पसरते सप्तरंगी छटा

भावना पेरतात दुःखे

भावनांची झुलते भाळावर बटा


भावनांचं असते अस्तीत्व

भावना गातात गीत

भावना करतात प्रेम

भावना मखमली आच्छादित


भावना करतात प्रशंसनीय कार्य

भावना करतात निराधार

भावनाच देतात आश्रय

भावना हरवून आपलाचं आधार


भावनांचा भार भरपूर

भावनांच्या असतात व्यथा

भावनांचा येतो पूर

भावनांच्या लक्ष लक्ष कथा


Rate this content
Log in