भावभोळा हरी
भावभोळा हरी
1 min
176
कार्तिकीची वारी / वारकरी घरी/
भावभोळा हरी / भक्तांघरी //(१)
कर कटेवरी / दिसती तयाचे /
जन कल्याणाचे / काम करी //(२)
डोळ्यांत करुणा / भावनाप्रधान
नैवेद्यासी मान/नाम्याचिया //(३)
चोखोबांची गुरे/जनीचे दळण
शेताचे रक्षण / दामाजीच्या //(4)
ज्ञानेश्वरी, गाथा / ग्रंथांचे लेखन/
देई स्फूर्तीदान / कृपादृष्टी //(५)
देव नित्य वसे / भक्तांच्या अंतरी /
नका जाऊ दूरी / पंढरीसी //(6)
भावाचा भुकेला / भक्तीची तहान /
विठ्ठल महान / शब्दातीत //(७)