भावाची छाया.
भावाची छाया.
1 min
27.4K
मनगटी तुझ्या मी
विश्वास बांधते.
मी सुरक्षेची माझ्या
आस बांधते.
पाहते मी इथे तिथे
मला तूच दिसतो.
भाऊराया मनी माझ्या
कायम तूच असतो.
बाबांची तुझ्यामध्ये
छाया मला दिसते.
स्पर्शात ती दादा
माया मला भासते.
तू माझा पाठीराखा
कृष्णासारखा.
माझीच रे प्रतिमा तू
सावलीसारखा.
कधी तू माझा बाबा होतो,
कधी मी तुझी होते आई...
तू माझा ज्ञानदा
मी रे तुझी मुक्ताई....
