साजन
साजन
1 min
7.4K
लाजून, लाजून झाली
तू चूर.
मनी तुझ्या प्रसवली
गोड हूरहूर.
नयनी पहावे
कुणीतरी खोल.
प्रेमाचे यावेत वाटे
आपल्यासाठी बोल.
रोजच मिळावा
फुलांचा उपहार.
गोड हसून करावा
कमी चिंतेचा भार.
असा यावा साजन
या जीवनी..
न बोलताही जाणावे त्याने
काय आहे मनी.