भावाची आठवण
भावाची आठवण

1 min

280
होती रात्र पुनवेची ,
पावसाची धार होती ।
भावा तुझ्या आठवणीत ,
ताई वाट बघत होती ॥
माझ्या भावाची काळजी,
मला होती रे आठवत ।
संकटाच्या वेळी सदा ,
उभा राहतो सोबत ॥
तुझा आधार मला आहे ,
दूर गेली मी तुझ्या रे ।
तरी आहे सोबत तुझे ,
प्रेम नेहमी माझया रे ॥
मी खुप नशिबवान आहे ,
मला कधी कशाची पर्वा नसे ।
रागवणारा व प्रेम कराणारा भाऊ ,
सर्वात जास्त तुच असे ॥
आयुष्यात निसर्गाने,
दिला भाऊराया मला ।
त्याच्या सानिध्यात राहून ,
काही काळजी नाही मला ॥