STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

भाऊबीज

भाऊबीज

1 min
30.7K


बहीण भाऊ!

पवित्र नातेबंधन!

एकत्र खेळणे, भांडणे

खोड्या, चहाड्या तक्रारी

एकत्र आहेत तोवर

बहीण सासरी जाईपर्यंत

ती सासरी गेली की,

रोज भावाची आठवण


हुंदक्यांची साठवण

प्रतीक्षा भाऊबीजेची

भावाच्या भेटीची!

बहीण नेते वेळ निभावून

आकाशातल्या

चंद्रालाच भाऊ मानून

भाऊबीज!


यमी आणि यमाच्या

भेटीचा दिवस!

बहीण भावाला औक्षण करते ,

भावासाठी आयुष्य मागते

भावाचं चारित्र्य, शील

यांचं रक्षण मागते,

यमाजवळ!


तिलक करून भावाला सांगते

बुद्धीचा तिसरा डोळा उघड

थोडा विचार कर!

भाऊराया, मी दूर नाही

तुझ्या अवती भवतीच आहे

कोणतीही स्त्री समोर दिसली

तर माझी आठवण कर

बघ तुला तिच्यात मी दिसते का?


तिथे मी दिसली तर

तीच माझ्यासाठी

सर्वोत्तम ओवाळणी

तीच भाऊबीज!

बहीण भावाच्या नात्याची

पवित्रतेची

भाऊबीज!


Rate this content
Log in