भाऊ..!
भाऊ..!
मी धडपडते तेव्हा सावरतोस तू...
मी रुसून बसते तेव्हा हसवतो तू
संकटे आली तर पाठीशी उभा असतोस तू..
कधी अभिमान तर कधी स्वाभिमान असतोस तू
कधी बाबा तर कधी मित्र असतोस तू..
कधी मृदू तर कधी प्रेमळ असतोस तू
जीवनाचा प्रत्येक वळणावर हक्काचा साथीदार असतोस तू..
माझावर येणाऱ्या प्रत्येक सुख-दुःखात जोडीदार असतोस तू
माझा आजचा आणि उद्याचा सल्लागार असतोस तू..
हसवणारा आणि रडवणारा जादूगार असतोस तू..
तुला शब्दात सांगता येणार नाही असा आहेस तू...
आजच्या special दिवशी प्रेमळ आठवांनी
नि गहिवरून आणणारा माझा "भाऊ"आहेस तू...