भातुकलीचा डाव
भातुकलीचा डाव
1 min
400
भातुकलीचा डाव
बाहुली माझी सुंदर
भातूकली तिचं नाव
आवडतो मला बाई
भातुकलीचा डाव
भातुकलीला नेसवली
सुंदर पिवळी साडी
भातुकलीच्या डावात
मांडली खेळभांडी
छोटी छोटी भांडी
पोळपाट तवा ही छोटा
दगडाच्या चुलीवर
शिजला भात रटारटा
एवढ्याशा कणकेची
किती छोटी गोळी
इवल्याश्या हातांनी
लाटली छोटी पोळी
एवढ्याशा ताटात घ्या
भात गरमागरम
तुपसाखरे सोबत खा
पोळी नरमानरम
छोट्याश्या पेल्यात
प्या थंडगार पाणी
भातुकलीच्या डावात
बाहुली माझी राणी!!!
