भास तुझे होताना
भास तुझे होताना
1 min
14.7K
जडली प्रीत
बांधल्या रेशीम गाठी
आशीर्वाद पाठी
थोरांचे.
आवडे तुज
माझे लाजून हसणे
सुंदर दिसणे
कलिकेपरी.
फूलता संसार
लागली नजर दुष्ट
केले रुष्ट
नियतीने.
मोडुनि डाव
गेलास निघुनि दूर
आसवांचा पूर
नयनी.
भरायचास रागे
म्हणुनि अश्रू पुसते
गालांत हसते
तुझ्यासाठी.
आठवे मज
घेऊनि हातात हात
फिरणे दिनरात
तुझ्यासवे.
हसते मनात
भास तुझे होताना
खळी पडताना
गालांत.
