भारतीय जवानांसाठी मानवंदना
भारतीय जवानांसाठी मानवंदना
जिव्हाळ्याच्या नात्यांची ओढ
मनाला अगदी गलबलून टाकायची,
म्हणून मग
कुटुंबाच्या ओढीने परतलो घरी,
घेऊन रजा देश सीमेवरून..
आई, बाबा, पत्नी, मुले
सर्वच आतुर माझ्या भेटीसाठी,
येता घरी आनंद पसरला,
गळाभेटीने देह गहिवरला.
मौजमजा, दंगा, मस्तीत
होती रजा घालवायची.
पण अचानक आली खबर ,
सीमेवर युध्द सुरू झाल्याची.
जिवलग नात्यांचा घेऊन निरोप,
चाललो मी माझ्या
मायभुमीच्या रक्षणार्थ.
जाता जाता घरच्यांना,
सांगतो एक विश्वासाने,
खरच मी परत येईन.
वाट तुम्ही पाहता जसे
तशी पाहते वाट मायभू.
लेकरु करले रक्षण माझे
मनी असते तिला खात्री.
शत्रुंशी करुन सामना,
मिळवेन विजय युद्ध जिंकून.
सीमेवरती देऊन लढा
नक्की मी परत येईन.
ऊन, वारा,पाऊस ,पाणी,
कडे कपारी, डोंगरे दरी,
उंच पहाडे करुनी पार
भेदून टाकेन हर खतरे.
आहे मी वीर जवान सैनिक,
नाही मज फिकीर कसली.
शत्रुंना करेन बेजार,
लढेन निधड्या छातीने.
असो बॉम्ब हल्ला वा
असो बंदुकीच्या गोळ्या,
झेलेन छातीवर निडरपणे.
हटणार ना मागे मी कधीच,
घाबरून माझ्या मरणास..
आलीच वेळ तर होईन शहिद,
शेवटच्या श्वासापर्यंत
करेन संघर्ष शौर्याने,
राखण्या या तिरंग्याची शान..
यदाकदाचित जर
झालोच शहीद,
तरीही..
मी पुन्हा जन्म घेऊन,
नक्कीच परत येईन.
मी परत येईन..
फक्त तुमच्यासाठी अन्
माझ्या मातृभुमीच्या
रक्षणासाठी..
मी परत येईन...
