STORYMIRROR

Priti Dabade

Others

4  

Priti Dabade

Others

भाजीपाला

भाजीपाला

1 min
149


बटाटा, वांग साऱ्यांच्या 

घरातील खानपान

लग्नसमारंभात असतो

भाजीचा विशेष असा मान


भोपळा, दोडका अजिबात

वाया जात नाही

शिरांची चटणी, हलवा 

बनतं बरचं काही


गाजर, काकडी, कोबी

असतात तोंडी लावायला

त्याशिवाय पूर्णच होत 

नाही ताट जेवायला


टोमॅटो आपला लाल

गोलगरगरीत छान

प्रत्येक भाजीत मिळवतो

महत्वाचे स्थान


लसूण, आल्याची तर 

बातच निराळी

औषधी गुणांची यादीच 

आहे वेगळी


हिरव्यागार पालेभाज्या 

वाढवती स्वाद

सर्वांची मिळे

त्यांना दाद


कांदा आणतो 

डोळ्यात पाणी

पण त्याच्याशिवाय

अन्न बेचव अळणी


हिरवा रंग मिरचीचा

मोहवून टाकतो

भाजीत टाकताना तिला

विचार करावा लागतो


सगळ्या भाज्या 

देतात जीवनसत्त्व 

म्हणूनच आहे त्यांना

अनन्यसाधारण महत्व


Rate this content
Log in