STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

भाबडी भावनिकता...!

भाबडी भावनिकता...!

1 min
27.8K



प्रसंगावधनाची कमतरता

हीच आमची सहिष्णुता

घोडचूक करण्या सरसावते

आपली भाबडी भावनिकता


काय घडले की डोकावते

चाणाक्ष नजरेने सारे टिपते

सुखदुःखात समरसते

आणि नको ते करून बसते


प्रसंगाचे गांभीर्य माणुसकीपोटी

सहज लीलया पेलतो खांद्यावर

सारे कळते वेळ निघून गेल्यावर

काहितरी अघटित घडल्यावर


अजूनही सज्ञानातही अज्ञान

वावरते उजळ माथ्याने

तिलांजली द्यावी वाटते

या अज्ञानाला आता नेटाने


डोळे उघडा अन आतातरी

सजगतेची सारे कास धरा

सद्विवेक बुद्धीने साकल्ल्याने

प्रसंगावधानाचे खरे कार्य करा


बघण्यासाठी जन्म सारा

मदतीसाठी हात जरा पुढे करा

संकटात भर घालण्यापेक्षा

निदान संकट टाळण्याचे तरी भान धरा


आग पाणी विद्युत लहरी

कधी कोणाचे सगेसोयरे नसतात

चार हात दूर रहाण्याचे सोडून

मूर्ख सारे इथे गळ्यात पडणारे दिसतात


बोध घ्यावा इतरांनी म्हणुनी

चार ओळी लिहाव्या वाटतात

नको नको ते प्रसंग सारे

अज्ञाना पोटी पुन्हा पुन्हा घडतात....!


Rate this content
Log in