बेरोजगारी
बेरोजगारी
दिवस भरच्या असंतोषाने
सायंकाळी कुत्रे भूंकत होती
उसनवारी कामे करून
काही माणसे लळत होती
बेरोजगारीचा ठप्पा लावून
अर्ध:रोजगारीचा कालवन खात
तळपत्या बेचैनीत आर्त हाकेने
सांगतात नशिबाने मारली लात
असंतोषाने भरलेल्या नजरा
जिवन शून्य झाले ध्येय
या अर्ध मेलेल्या माणसाची
सुखी समाधान्यास कसली गेय्य
जिवनात यांच्या पडली आहे
खिन्नतेची गळद छाया
भकास वाटेवर चालताना
सुटली जगण्याची माया,
रोजगारासाठी खस्ता खावून
असमाधानात दुखतोय पोट
नौकरी धंधा नाही म्हणून
स्वकतृत्वास लागलं गाल बोट
पांढरपेशा समाजात वावरताना
उरली नाही कसली शान
शापीत उरलेल्या जिवनात
जगताना उरला नाही मान
जागा, बेरोजगार युवकांनो
स्वकर्तुत्वाचे तोळा मौन
आत्मविश्वासची ताकतीने
साम्यवादी रचनेचा तोळा मौन
