STORYMIRROR

Prashant Shinde

Others

1.6  

Prashant Shinde

Others

बेंदूर...!

बेंदूर...!

1 min
28.2K



शेतकऱ्याची पोर आम्ही

आम्हाला ना आगा ना पिच्छा

राब राबतो रानामध्ये

नसता मनात काही इच्छा


धनी माझा लई समाधानी

त्याची भावते मला इमानी

आहे तो आमचा घरधनी

काहीच नसते त्याच्या ध्यानीमनी


तीन सांगितलं तेंव्हा उठतो

तीन संगीतलं तेंव्हा बसतो

तीन सांगितलं म्हणून तर

त्याला आज आहे बेंदूर कळतो


त्याच्या साठी रोजच

असतो सदैव बेंदूर अन पोळा

धाप लागता मला जरासा

येतो त्याच्याच पोटात गोळा


माझ्या वरती लक्ष सार

म्हणून माझं नाव ठेवलं लक्ष्या

काहीच ठेवीत नाही कधी

मना मध्ये कोणतीच अपेक्षा


आज मात्र मला तो

आनंदाने न्हाऊ घालतो

हवं नको ते पाहून

सार सार प्रेमाने देतो


त्याची माया पाहून मी

क्षणातच देवा घायाळ होतो

माझ्या शेतकऱ्यासाठी मी

सदैव जीव टाकतो


सण आजचा माझ्या कौतुकाचा

जरी असला हा बैल पोळा

त्याच्या आनंदासाठीच मी सजतो

कारण धनी माझा आहे साधा भोळा


मी त्याचा अन तो माझा

लक्ष असते माझे असते त्याच्यावरी

ध्यानी मनी असतो त्याच्याच मी

म्हणत असला जरी तो हरी हरी....!!!


Rate this content
Log in