STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

बेधुंद पावसाळी काव्यसर...

बेधुंद पावसाळी काव्यसर...

1 min
62

बेधुंद पावसाळी काव्यसर बरसली अशी ,

ओलीचिंब त्यात मी मोहरून वेडीपीशी ...

किती दिवसांनी काव्याची हाक आली ,

होते नव्हते दाटले मनी शब्द मला पुसशी ...

दुनिया वेडावलेली छंद ना कळे तयाला ,

छंद डोळ्यात उतरे मनात खुशीची सरशी...

डाव देण्याची पाळी माझ्यावर आली,

खेळात रंगले मी कधी बाद कधी जिंकशी...

आठवांचे झुले श्रावणमासी अमृतफुले ,

ओंजळीत भरले निर्माल्य जमीनीत पुरशी ...

बेधुंद पावसाळी काव्यसर बरसली अशी ,

ओलीचिंब त्यात मी मोहरून वेडीपिशी ...


Rate this content
Log in