बेडकी...!
बेडकी...!
गावाकडे खूप मजा होती
पहिला पाऊस पडला की
रात्री बेडकी ओरडायची
आवाजानेच भीती वाटायची
रात किडे किर्रर्र किर्रर्र करायचे
काजवेही मधून मधून चमकायचे
एखादा काळ भुंगा याचा
आणि गिरकी घालून पिडायचा
राती घराबाहेर पडणं म्हणजे
मोठं युद्ववर जाण्याचं काम असायचं
हातात कंदील ,काठी आणि
सोबतीला हरीण छाव छत्री असायची
आज आठवल सार
कारण मी बेडकीच पिल्लू
पावसातून पडलेल पाहिलं
आणि मन हेलावलं
आम्ही शाळेत असताना
वर्गात आलेली पिल्लं
हातात धरून टाकायचो
आणि मूठ करून भीती दाखवायचो
आज त्या पिल्लानी
मला आठवण करून दिली
बंड्या बाब्या रुक्मि पम्मी
सारी पात्र नजरे खालून घातली
बर वाटलं आणि मी आभार मानले
डोईवरच्या पावसाचे
दिवस माझे त्याने आठवून दिले
जे होते खरच नवसाचे
आज ती बेडकी नाही ,तो काजवा नाही ,
तो रात कीडा नाही,तो भुंगा नाही
लख्ख प्रकाशमान जीवन झालं
पण माझं भयाच गोड बालपण हरवलं....!
