बैठक
बैठक


अशा या चांदण्या रात्री
हात तुझा हाती घेऊनी
जवळी तू रहा माझ्या
ऋतु राग हा खामज गाती
नको तो पसारा
नको तो दुरावा
आतुर दोघेही अबोला
मी दीप गाती उजळून ह्या फुलवाती
मल्हार तू गाता बघ मेघ ही बरसला
मंत्रमुग्ध व्हावे मी तुझ्या सप्तकानी
तारकांनी गावे बागेश्री राग हा
स्वरातूनी फुलावे श्र्वसानी ह्या
स्वाधीन मी व्हावे तल्लीन होऊनी
केदार गाता रात ही उलटूनी जावी
अलगद सुखाच्या सरीची पहाट ही भिजावी
ओल्या क्षणाची जणू सरगमच व्हावी
सुमधुर शेवट भैरवी हाती घ्यावी
अशा ह्या चांदण्या रात्री
रोज सुरांची बैठक व्हावी
मी तुला तुला मी ती समजून घ्यावी