STORYMIRROR

Pratik Kamble

Others

2  

Pratik Kamble

Others

बाप्पा मला मरण येवू दे

बाप्पा मला मरण येवू दे

2 mins
2.4K


 

काबार कष्ट करुन सुध्दा

पोटाला पोटभर अन्न

अंगावर एक जोडी कपडे

शेतात पिकावायला धान्य

आणि गुरांना खायला चारा सुध्दा नाही रे बाप्पा

अशा प्रसंगी काय करु मी बाप्पा

मला वाचवू नको तू मला फाशी घेवून जीवन संपवू दे

बाप्पा मला मरण येवु दे

 

दुष्काळाने ग्रासलोय रे मी

काबार कष्ट करुन थकलोय मी

पीक पिकवण्यासाठी राबलोय मी

परंतू काही फायदा त्याचा झाला नाही

खूप तान आलाय मस्तकी बाप्पा

धान्य सार शेतातील करपलय

भान माझ नुसत हरपलय

जगून माझा काही अर्थ नाही रे बाप्पा

मला वाचवू नको तू मला फाशी घेवून जीवन संपवू दे

बाप्पा मला मरण येवू दे

बायकोची हौस ती

पोरांच ते शिक्षण

संसाराचा तो बोजा

शेतीसाठी लागणारे ते धान्य

कवडी मोलाच्या भावात मी

हे सगळं पुरवू तरी कसं

पोराच्या पाटीवरच 'मी शेतकरी'

हे अक्षर गिरवु तरी कसं

त्या अक्षराचा अर्थ त्या सरकारला आणखी कळलाच नाही रे बाप्पा

मला वाचवू नको तू मला फाशी घेवून जीवन संपवू दे

बाप्पा मला मरण येऊ दे

धान्य माझं पिकलय परंतु

त्याला हमी भाव नाही

सुदंर माझी पोर ती

आज वयात आली

लग्न तिच करायचय पण

पैसा जवळ नाय हाय

पैसा नाही जवळ माझ्या आता

काय करू मला काही कळतच नाही रे बाप्पा

मला वाचवू नको तू मला फाशी घेवून जीवन संपवू दे

बाप्पा मला मरण येवू दे

सावकराची ती देणी-घेणी

बँकेची ती काढलेली लोन

वाण्याची ती रोजची उधारी

गुरांच्या चाऱ्याचा तो खर्च

हे सगळ मी देऊ तरी कसा

तूच सांग मला बाप्पा

येवढे कर्ज डोक्यावर असून मला

मान ताठ करुन जगता येत नाही रे बाप्पा

मला वाचवू नको तू मला फाशी घेवून जीवन संपवू दे

बाप्पा मला मरण येवू दे

 

 


Rate this content
Log in