STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

बाप

बाप

1 min
29.1K


वेदनांच्या झोळीतला सुखाचा घास बाप माझा

पैलतीराच्या काठावरचा स्वप्न कुंचला बाप माझा

श्रावणातल्या पालवीचा गन्ध फुल बाप माझा

दाही दिशांच्या वाटेवरचा कल्पतरू बाप माझा

हर्ष उत्कन्ठेचा भरलेला पेला बाप माझा

आसवांच्या लपलेल्या कवडशांचा प्रतिबंब बाप माझा

सांज रातीच्या चांदव्याचा गुंज ओलावा बाप माझा

मायेच्या कुशीतला अबोल हळवा बाप माझा

राकट मेरू परि कणखर बाणा बाप माझा

विरह प्रेमाने पाणावणारा बाळ लेकरू बाप माझा

कष्टपंखाच्या भरारीतला गरुड झेप बाप माझा

पीर,अल्लाह,ईश्वर,गुरू-माऊली बाप माझा


Rate this content
Log in