बाप
बाप

1 min

24
बाप म्हणजे घराचा आधारवड
आनंदाने पुरवतो पोराबाळांचे लाड
वाटला जरी वरून कठोर
आतून असतो मृदु फार
घरात असतो त्याचाच वट
मुलाबाळांसाठी असतो तो खरा नट
बाप म्हणजे थोडी भीती
सांगू त्याच्या गोष्टी तरी किती
दिवसभर राबतो घरादारासाठी
आराम करत नाही कधी स्वतःसाठी
फिरावं लागायचं उन्हातान्हात गावोगाव
सोसले खूप सारे त्यांनी घाव
मुलांच्या कर्तृत्वाचा वाटतो त्याला अभिमान
राहिल सदैव प्रयत्न त्याचा राखण्यात मान