STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Others

4  

Dnyaneshwar Bhoyar

Others

बालपणीची आठवण

बालपणीची आठवण

1 min
27.6K


दरवर्षी ग्रीष्मात जाता गावी

बालपणी चे रान आठवी

वृक्षवेली डोलतांना पाहून

कळेना गेले भानही हरपून ||१||

दिमाखात उभे राहती तरू

शितल सावलीत खेळी पाखरू

सवंगडी अन सखे सोबती

कुणी ना त्या वाचुनी दिसती ||२||

एकटाच बसता बुंध्यावरती

सूर्य चढला माथ्यावरती

उगाच आस मनी लागली

येणार सखा चाहूल घातली ||३||

रानोमाळ मन वासरू होऊनी

चढून उतरावे फांदीवरूनी

आंब्याच्या सावलीत मांडुनी

आकारू मातीची खेळणी ||४||

बालपणी चा मेवा

असे आठवणींचा ठेवा

मज पुन्हा पुन्हा मिळावा

ह्या आशेवर घेतो परतावा ||५||


Rate this content
Log in