बालपण
बालपण
1 min
11.6K
बाबा नोटांच्या या बाजारात,
नाण्यांचा तो आनंद परत देशील का रे
मी परत तुझी वाट बघेन,
तो एक रुपया परत माझ्या हातावर टेकवशील का रे...
चल बाबा परत आपण मागे जाऊया,
राजा आणि राजकुमारीचा तो खेळ खेळूया
झोपताना परत माझ्यासाठी तेच गाणं म्हणशील,
लपाछपीच्या खेळामध्ये तू मुद्दाम हरशील...
माझं बाळ म्हणून तू परत पापा घेशील,
पाय दुखत असताना तू खांद्यावरती घेशील
चल बाबा, परत आपण ते सारं करूया,
शहाणेपणाच्या या विश्वात परत बालपण आणूया...
