STORYMIRROR

Smita Murali

Others

4  

Smita Murali

Others

बालकविता'विमानाची सफर'

बालकविता'विमानाची सफर'

1 min
2.6K


विमानाची सफर


महाग असतं म्हणे

विमानाचं तिकीट

बाबांचे होईल मग

रिकामचं पाकीट


देवा रे देवा पाड

पैशांचा थोडा पाऊस

विमानाच्या सहलीची

आता पुर्ण कर हौस


विमानात बसून मी

जाईन मस्त आकाशी

जवळून पाहीन रे

उंच उडणारे पक्षी


उडणारे विमान आता

किती दिवस पाहू

सांग तुच कधी मी रे

विमानी बसून जाऊ


विमान घेईल उड्डाण

आणि जाईल वर वर

आभाळातून दिसेल का

छोटुसं माझ घर


विमानातून पहिन मी

पहिल्यांदा हवाईमार्ग

शोधेन कुठे दिसतो का

आभाळातला स्वर्ग


सांग देवा मला कधी

देशील का असा वर

कधीतरी घडू दे ना

विमानाची ही सफर!


Rate this content
Log in