बालकविता - माझी नानी
बालकविता - माझी नानी
1 min
28.4K
माझी लाडकी नानी
सांगे रोज कहाणी
गाई छानशी अंगाई
मी गाढ झोपी जाई ।।
म्हणे माझी नानी
पहाटे की रे उठावे
सांगितलेले ते ऐकावे
आचरणात आणावे ।।
भले व्हावे आपुले हे
नानीचे सांगणे खरे
वागू या आपण चांगले
आपल्यासाठी के बरे ।।
