बालकाव्य
बालकाव्य
1 min
347
*चिमुकली व्यथा*
आई बाबांच्या आठवणीने
आला दाटून माझा ऊर
चिमुकल्या डोळ्यामधला
आवरू कसा आसवांचा पूर
उभा राहिलो हतबल होवून
छातीशी माझ्या छोटा भाऊ
काय करावे काहीच कळेना
कोठून आणू छोट्यासाठी खाऊ
अनाथ म्हणून कोठे भटकू
छोट्या जीवाला कळेना काही
कोणास म्हणावे आपले इथे
कोण आपले कळतच नाही
अल्लड हातात कळेना कशी
आली अशी खरोखरची बाहूली
बालिशपणा विसरुन माझा
देवा कुठे गेली माझी माऊली
देवा तुच धाड कुणालातरी
कर आमच्यावर थोडी कीव
उघड तुझे अंतरीचे डोळे
सांग कोण लावेल जीव
देवबाप्पा हिरावलीस अकाली
आईबाबांची चिमुकल्यांवरची माया
आलो तुझ्याच दारी आसऱ्याला
तुच दे चिमुकल्यांना छत्रछाया!
