STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

बालदिन

बालदिन

1 min
2.1K


बालदिन


बालदिन आला बालदिन आला

आम्हा मुलांना आनंद झाला

झाला झाला झाला झाला आनंद झाला

नेहरुंजींची जयंती, करुया साजरी

नेहरुंजींना फुले आणि मुले होती प्यारी


तबडक तबडक तबडक तबडक


भारताचे पहिले पंतप्रधान

चाचाजींचा आम्हाला अभिमान

स्वरुपाराणी आणि मोतीलाल नेहरु

यांचे सुपुत्र जवाहरलाल नेहरु

आज त्यांची जयंती साजरी करु चला


तबडक तबडक तबडक तबडक


बालकांना मिळाला मान सन्मान

बालदिन साजरा करु चला छान

उपक्रम खेळ गाणी गोष्टी कला

शिक्षणातून विकास असा झाला

भारताचे भविष्य आम्ही बालक लहान

तबडक तबडक तबडक तबडक


सक्तीचे आणि मोफत शिक्षण

बालरक्षक करतात आमचे संरक्षण

आनंददायी झाले आता शिकणे

आवडू लागले शाळेत जाणे

चला चला आवडीने शाळेत जावू


बालदिन आला बालदिन आला

आम्हा मुलांना आनंद झाला


Rate this content
Log in