बाहेरचा रस्ता...!
बाहेरचा रस्ता...!
1 min
26.4K
सहजच त्याने मला
बाहेरचा रस्ता दाखवला
पण मला त्याचा
राग नाही आला....
वाटले,मला कुठली आली
लाज लज्जा शरम
झाले होते जरी
डोके क्षणात गरम....
माझे कर्म माझा
पिच्छा पुरवत होते
जाईल तिथे
सावली सारखे येत होते....
सावलीला घाबरून
मला नाकारले जात होते
तेच माझे अंतर्मन
आनंदाने पहात होते....
वाटले सावलीचा सूड घ्यावा
नाहीतर चावा घ्यावा
पण क्षणभर विचार केला
आणि म्हटले उगा भाव का द्यावा ?
