STORYMIRROR

Bharat Kamble

Others

3  

Bharat Kamble

Others

बाहेर मरण आलंय

बाहेर मरण आलंय

1 min
234

कोरोना विषाणूच्या भीतीने 

घराबाहेर पडलो नाही 

वेड्यागत अवस्था झाली तरी 

दाढी कटिंग केली नाही 


रोज मुले म्हणतात 

पप्पा कामाला जात नाहीत 

आधीसारखे आमचे पप्पा 

खायला काहीचं आणत नाहीत 


नाही रे बाळांनो  

बाहेर मरण आलंय 

असेल तसे खाऊन 

घरात बसायचे केलंय 


मी बाहेर पडलो तर 

माझे मरण स्वस्त होईल 

माझ्या नंतर तुुमची रे 

सांगा काळजी कोण घेईल 


हुंंदके देत मूूले म्हणाली 

पप्पा बाहेर नका जाऊ 

बाहेरचे खाण्याऐवजी 

असेल नसेेल ते खाऊ 


निघून जाईल ही वेेळ 

अशीचं कायम राहणार नाही 

जगता येईल त्यानंतर 

हे जीवन पुन्हा नाही ...


Rate this content
Log in