STORYMIRROR

Savita Kale

Tragedy

4  

Savita Kale

Tragedy

बाबा आठवण येते तुमची तेव्हा......

बाबा आठवण येते तुमची तेव्हा......

1 min
8.8K

विधात्याची कशी अजब खेळी

बाबा तुम्ही सोडून गेले आम्हां अवेळी

बाबा हाक मारतो जीव रोजच 

पण प्रतिसाद देण्या बाबा नाही जवळी


लहानपण तुमच्या सावलीतले

काही केल्या विसरत नाही मन

समजूत काढून थकले मनाची

तरीही रोजच येते तुमची आठवण


जत्रेत, गर्दीत कधीच सोडला नाही हात

मग या जगात एकटे सोडून गेलात कसे

काय होईल माझ्या मनाची अवस्था

आयुष्य तुमच्या शिवाय सरेल कसे


एखादं निराधार वासरू भटकावं रानात

तसचं काहीस माझे झालयं

अश्रू पुसण्यास या ना बाबा

आता मन खूप भरून आलयं


भेट पुन्हा होईल कधी

हाकेला ओ द्याल कधी

स्पर्श तुमचा होईल कधी

सांगा ना बाबा मला जवळ घ्याल कधी...... 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy