STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

3  

Yogita Takatrao

Others

बाबा आणि लेक

बाबा आणि लेक

1 min
847


सगळयाच गोष्टीनां मुलींना आता बाबाच लागतो

बाबाही मग सर्वात पहिले मदतीसाठी धावून जातो


बाबाच घरात पाऊल पडताच धावत सुटतात मुली

आज काय आहे गंमत विचारणा मारून घट्ट मिठी


बाबा घरी असता मस्तपैकी यांची धमाल असते

दोघांची जोडगोळी घरात मस्तिचं उधाण आणते


चित्र जरा बदलतंय नाही तिला बाबा ची भिती

लेकीला बाबा अधिक प्रिय ही आजची परिस्थिती


तो दिवस दूर नाही ती सांगेल एकूण एक गोष्टी

आईलाही मग नसेल दोघांच्या गप्पांमध्ये एंट्री


बाबालाही जरा लेकीची जास्तच काळजी असते

सगळंच अप्रतिम असावं त्याची धडपड असते


तिच्यासाठी कसलीही ठेवत नाही कमतरता

आनंद त्याला पहिला घास तिलाच भरवता


लेक ही कौतुकाने रोज बाबा ला घास भरवते

सगळचं लागणारं बाबाला हातात आणून देते


हट्ट असतो तिचा असा बाबाला औषधही तिच देते

सगळं माझं बाबाच करणार अशी लाडीक धमकी देते


दोघांच्या ह्या निखळ आस्थेला काळा टिळा लावूया

नजर ना लागो या प्रेमळ नात्याला प्रार्थना करूया


लेक अशीच बाबांबरोबर बिनधास्त राहो

नातं बाबा मुलीचं असंच आयुष्यभर फुलत राहो






Rate this content
Log in