STORYMIRROR

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

ॐ नमः शिवाय

ॐ नमः शिवाय

1 min
15K


आला बाई आला । श्रावणाचा मास ।।

सोमवार खास । शंकराचा ।।1।।


चला गं सयांनो । गोकर्णाचे फूल।।

आणू फळ, बेल । पुजेलागी।।2।।


धूप ,दिप,भस्म । कापूर लावूया ।।

शंभोस भजूया । भक्तिभावे ।।3।।


देवाचांही देव । भोळा महादेव ।।

नीलकंठ नाव । शोभतसे ।।4।।


सर्पाची ती माला । रुद्राक्षाच्या माळा।।

शोभतात गळा ।शंकराच्या ।।5।।


डमरू डमाक । त्रिशुल ते हाती।।

चन्द्र गंगा माथी । सदोदित ।।6।।


सांब सदाशिव । कैलासाचा नाथ।।

नंदी करे साथ । तयालागी ।।7।।


तीर्थक्षेत्रे तुझी । ज्योतिर्लिंगे बारा।।

भक्तिभाव सारा । तव पायी ।।8।।


त्रिनेत्रधारी तू। तांडव करितो।।

क्रोध तुज येतो ।अतोनात ।।9।।


सोळा सोमवार ।करिते व्रत मी।।

आहे मज हमी । तुचि त्राता।।10।।


Rate this content
Log in