अत्याचार
अत्याचार
दाबून मुसकट्या, केला बलात्कार
वासानाधिश होउन तो नर,संपवला खेळ
ना आले कुणी वाचवायला, कशी ही वेळ ?
नाही संपला या वृत्तीचा हा खेळ ?
आयुष्याची तुटते तार,जिवनाची संपते आस
वेदनांच्या या सागरी, मुकतो हा प्राण
दया ना हो आली, हवस होती भारी
लुटते तेथे घरच्याची निर्दयी ती आण
जखमांवर देऊन जखम, नराधम हसतो
आसुची धार वाहते नयनी,भंगली अबला
कुठे होता, द्रोपतीचा सर्वेश्वर कान्हा
वाचवण्यास अब्रू,कुणी भाऊ नाही धावला
कपड्यांची झाली चिंधी,नाही पेटली टिंगणी
मोकळ्या आभाळी झाला हा अपराध,
कसा पाहिला तू देवा,का नाही आला राग ?
ना तांडव, नाही तिसरा डोळा हा तुझा अपराध
देहाला देऊन मुखाग्नी, बघ हा पहाड दु:खाचा
नाही होणार वेदना कमी,त्या निदोष जिवाच्या
गेली ती मातीत, न्याय आणखीन बाकी
मागतो हिसाब समाज त्या निदोष जिवाच्या
नका करु किव, कठोर शिक्षा हवी
ना पुन्हा कोणी रावण,हात ना पकडेल नारीचा
न्याय स्वराज्याचा,पुन्हा शिवाजी घडवा
नका जाऊ देऊ पुन्हा बळी आपल्या लेकीबाळीचा
नका जाऊ देऊ पुन्हा बळी आपल्या लेकीबाळीचा
