अटल स्वगत...!
अटल स्वगत...!
मज म्हणाले ते जाता जाता
पहा अंतरातून ध्वनी उमटतो
म्हणती का हो गेलात सोडून...?
म्हटले निःशब्द मी प्रेम कैदी
चिर शांतीची शिक्षा भोगण्या
चाललो मी सर्व इथेच सांडूनी....!
काही नव्हते मज जवळी
तरीही श्रीमंत या जगी
मागे पहा येती किती अश्रू घेऊनी...!
जीवन माझे कृतार्थ झाले
ऋणी राहीन सदा हृदयात
तुमचे निःस्वार्थ प्रेम घेऊनी....!
जाता जाता अश्रूही सांडतो
जड झाले माझे डोळे
प्रेम आपले अतूट पाहुनी...!
रहा गुण्या गोविंदाने
एकदिलाने आनंदाने
संवेदनशील सहिष्णुता उरी घेऊनी...!
उन्नत उज्वल जीवन
आपल्या पुढे ठेविले
परमेश्वराने किती सुंदर मांडूनी....!
आम्ही जातो आमच्या गावा
आमचा राम राम घ्यावा
बोलले इतुके मज ते छान....!
जाता जाता आम्हास
हसतमुखाने निरोप मज द्यावा
उंच राहू दे जगी देशाची शान....!
