अस्तित्व
अस्तित्व


स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यात
शोधत फिरतो
होय, माणूस खरा
इथेच तर चुकतो
ठेचकाळतो, पडतो,
दुखावला जातो,
मग मनाने तो
घडत जातो
चुकांतून शिकतो,
पुढे चालत राहतो
चालत असताना
त्याला अस्तित्वाचा शोध लागतो
मग एकेक लढाई
लढत जातो
आणि उमेदीने मग
जिंकत जातो