अस्तित्व
अस्तित्व
1 min
216
पुष्कळ आले अडथळे
खडतर झाला प्रवास
धैर्य कधी सोडलं नाही
ना सोडली कधी आस
मनसोक्त जगण्याचा
घेऊ द्या मला ही आस्वाद
साधी आहेत स्वप्न माझी
नका करू त्याचा घात
आयुष्यभराची माझ्या असे
परमार्थ अन साहित्य शिदोरी
अस्तित्व हे माझे
कसं सोडू मी अर्ध्यावर्ती
उजळू द्या माझ्या देहाला
उमलू द्या माझ्या मनाला
पक्ष्यासम मुक्तपणे विहार
करू द्या माझ्याही जीवाला
