अष्टाक्षरी
अष्टाक्षरी
1 min
343
चंद्रमौळी झोपडीला
छत गर्द हिरवाई
देणं देवराया तुझं
सौख्य कृपाछाया डोई।
दरवाजा कुलपाची
नसे गरजच तीला
तुटपुंज्या संसाराला
नेत्र माझे राखणीला।
बहरते , मोहरते
साथ संगत लाभता
वृक्षराजी फुलारते
स्नेहभावे जोपासता।
पाखरांच्या उबेसाठी
छ्त्र अनादी अनंत
गोड मानून जगतो
येता माझ्या नशिबात।
दान दिले जे इतुके
ऋण मानते मनस्वी
वृक्षासवे बहरू दे
सुख चांदणे ओजस्वी।