असं का होतं??
असं का होतं??
असं का होतं???
(आपणही माहेरी जाऊन असं वागतो का?)
सावरलेला आवरलेला संसार
क्षणात विस्कटवते
माहेरी आलेली घरचीच परी
आसवे गाळुन सहानुभुती मिळवते
रचुनी भारी मनमौजी कहाणी
सोनपरी हट्टी लाडाची
आहेसचं खास साऱ्यांची
पण विसरु नकोस गं तू
इतरांच्या घरची परीही
आहे तुझ्याचसारखी सोनेरी
माहेरी होतीस लेक तु
जरी आता झालीस सुन तु
जपले तुला क्षणोक्षणी
तरीही झालीस तु स्वार्थी
माहेरी येताच विणतेस
जाळे मतभेदाचे
शिकली सवरलेली असुनही
मायपित्याला भरवतेस
करते होत्याचे नव्हते सारे
मतभेद वाट मिटलेले
प्रयत्नांची पराकाष्ठा करुनी
तेच नव्याने ऊकरुन काढतेस
येताच तु दरवेळी
भावजय जरी सान तुझी
समजुन घेई तुला नेहमी
तरीही मत्सरापाई सदैव
ठरविते तु तिलाच स्वार्थी
तुझं माझं करता करता
सारं माहेरातुनचं तर नेतेसं
माहेरात येताना माञ
तु रिकामी हातीच येतेस
मानसन्मान,कौतुक मिळालं होतं का याआधी?
विचारुन बघ स्वत:ला?कशी होतीस तु एकाकी?
सौभाग्याचा बहुमान मिळवुन दिला तुला कोणी?
इतक्यात तु सारं विसरली तरी कशी बरी?
पटतयं का बघ,विचार कर जरा
ओरबाडुन कुढुन मिळणाऱ्या सुखापेक्षा
कधीतरी देण्याचं सुख अनुभव तु जरा
सुख सुख दातृत्वाच कायं असतं
जगुन तर बघ अंहकार सोडुन जरा
एकदाच स्वत:पेक्षा इतरांचा विचार कर
म्हणजे न मागताच मान सन्मान
तुझ्या पदरात पडेल बघ
एकदाच स्वत:पेक्षा इतरांचा विचार कर
म्हणजे न मागताच मान सन्मान तुझ्या पदरात पडेल बघ
सौ.ऊर्मी( हेमश्री )घरत.पालघर
8793621091
urmigharat25@gmail.com
