अशी मी असामी
अशी मी असामी


खडतर प्रवास आजवर घडला
स्वाभिमानी स्वभाव नेहमीच नडला
बरेच निर्णय जीवनातले चुकले
जिद्दीने पुन्हा विश्व उभारले
अहंभावची बाधा कधी होऊ दिली नाही
लेखणीला माझ्या कधी थांबवले नाही
अन्याय कधी सहन झाला नाही
त्यासाठी मी नेहमीच लढत राही
संवेदनशील जरी असले तरी
उत्तम समाजकार्य करण्यासाठी
सतत माझे मन धडपडत राही
देशसेवेची मला आवड भारी
नात्यांत कधी व्यवहार करत नाही
मित्रांच्या एका हाकेला सदैव तत्पर राही
साधी सरळ व्यक्ती आहे मी खरं तर
स्वार्थी धूर्त माणसांपासून नेहमीच ठेवते मी अंतर
तत्वांशी कधी तडजोड करत नाही
लाचारी माझ्या स्वभावात नाही
कामात नेहमीच असते प्रामाणिक
कर्तव्यात जशी तत्पर सैनिक
जराशी मी हट्टी थोडी रागीट
तरी मी आहे थोडी स्वीट
कुणाला चुकून दुखावलं तर
वाटे माझ्या मनाला guilt
मनाने मी हळवी
विचार करते गंभीर
दिसत असले जरी शांत
तरी आहे मी खंबीर