STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

अशी कशी मी

अशी कशी मी

1 min
416


कळले नाही अशी कशी मी गुंतत गेले

कशी बुवाच्या मायेमध्ये अडकत गेले


मला प्रभूने प्रसाद दिधला मन बुद्धीचा

वापर त्यांचा करायचे मी विसरत गेले


सत्संगाला जाते, म्हणूनि अडवत नव्हता

सांब सदाशिव, अशा पतीला फसवत गेले


सांगत होता, अध्यात्माचा मार्ग चांगला

मी साधूच्या मागे मागे चालत गेले


कुटीत त्याच्या मला एकटी बोलवल्यावर

'साऱ्यांमध्ये मी मानाची' मानत गेले


सर्वांगावर हात तयाचा फिरत असता

'पाप नव्हे हा, प्रसाद त्याचा' समजत गेले


'पापी, भोंदू' आळ तयावर आला जेव्हा

'कुभांड आहे सारे' ऐसे ठरवत गेले


तुरुंगात तो गेल्याचे मज जेव्हा कळले

पाप तयाचे हळू हळू मग उमजत गेले


बोभाटा पापाचा त्याच्या झाला आता

साऱ्यांसोबत 'मी टू मी टू'च सांगत गेले


Rate this content
Log in